आपलं शहरबीएमसी

BMC Water Supply: येत्या गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईत ‘ या ‘ ठिकाणी पाणीपुरवठा 18 तास राहणार बंद…

मुंबई महानगर पालिका हद्दीतील काही भागात 27 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर पालिका हद्दीतील काही भागात 27 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या दिवसाच्या कालावधीत ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे 27 तारखेच्या सकाळी 10 वाजल्यापासून पुढल्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत एम/पूर्व आणि एम/पश्चिम भागातील मानखुर्द, गोवंडी, चेंबूर विभागांत 18 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ( BMC Water Supply: Water supply will be closed for 18 hours at ‘This’ place in Mumbai next Thursday and Friday …)

मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने लोकांना पाण्याची काटकसर करण्याचे आवाहान केले आहे. 27 ते 28 तारखे दरम्यान खंडित असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा, असे पालिकेचे म्हणणे आहे.

या भागात राहणार पाणी कपात

एम/पूर्व विभागः

 • प्रभाग क्रमांक १४०: – टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग
 • प्रभाग क्रमांक १४१ :- देवनार महानगरपालिका वसाहत, लल्लूभाई कंपाऊंड;
 • प्रभाग क्रमांक १४२ :- लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारत;
 • प्रभाग क्रमांक १४३ :- जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर;
 • प्रभाग क्रमांक १४४ : देवनार गाव रस्ता, गोवंडी गांव, व्ही. एन. पूरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गांव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गांव, गोवंडी स्थानक मार्ग, टि. आय. एफ. आर. वसाहत;
 • प्रभाग क्रमांक १४५: – सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे;
 • प्रभाग क्रमांक १४६ :- देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी नगर, बी. ए. आर. सी. (BARC) फॅक्टरी, बी. ए. आर. सी. (BARC) वसाहत

एम/पश्चिम विभागः

 • प्रभाग क्रमांक १५१ – साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर;
 • प्रभाग क्रमांक १५२ – सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तीक पार्क, सिद्धार्थ वसाहत, सुमन नगर;
 • प्रभाग क्रमांक १५३ – घाटला अमर नगर, मोती बाग खारदेव नगर, वैभव नगर, मैत्री पार्क, अतूर पार्क;
 • प्रभाग क्रमांक १५४ – चेंबूर कॅम्प, युनियन पार्क लाल वाडी;
 • प्रभाग क्रमांक १५५ – लाल डोंगर

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments