आपलं शहर

मास्कपासून नागरिकांची सुटका नाहीच? उपमुख्यमंत्री म्हणाले…

मुंबईत 87 कोटी 43 लाख 97 हजार 677 रुपये एवढा दंड मास्क न घालनाऱ्यांकडून वसूल केला आहे. पुण्यात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करून ७५ लक्ष ९२  हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती दिली.

महाराष्ट्रात मास्क मुक्ती लवकरच होईल असे संकेत देण्यात आले होते. मास्क मुक्तीबाबत नियमावली बनवणे गरजेचे आहे. परंतु कोरोना टास्क फोर्सशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. मास्क मुक्ति मिळणार का नाही यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मास्क न वापरण्याविषयी मंत्रीमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

अद्यापही कोविडचे संकट असल्याने नागरिकांनी मास्क वापरणे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यकच आहे. नागरिकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी चांगला मास्क वापरावा. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवावी, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुण्यात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करून ७५ लक्ष ९२  हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती दिली. तर मुंबईत 87 कोटी 43 लाख 97 हजार 677 रुपये एवढा दंड मास्क न घालनाऱ्यांकडून वसूल केला आहे.

मास्क मुक्तीबाबत २७ जानेवारी रोजी नाशिकमध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मास्क सक्तीपासून मुक्ती मिळेल हा गैरसमज आपण काढून टाकला पाहिजे. तसेच कोरोनाची साथ संपली  असे अजूनही जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले नाही. त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो की जर आपल्याला स्वत:ला वाचवायचे असेल, तर आत्तापर्यंतचे सर्वाच चांगले शस्त्र मास्क आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश होता. इस्रायलने अत्यंत वेगवान लसीकरण मोहीम राबवून जनतेला मास्कमुक्त केले पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पसरलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे,रुग्ण संख्या वाढू लागल्याने तिथे पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. आज जगात मास्क घालण्यापासून मुक्तता झालेल्या देशांमध्ये ब्रिटन, अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे. अलीकडेच सौदी अरेबियानेही लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments