
नुकतंच मुंबईतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे, याबद्दल किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी माहिती दिली होती. (College close: College will remain closed till this date, big decision of the Minister of Education)
मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतोय, त्यामुळे मुंबई पालिकेने आधीच 1 ली ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णयदेखील आता प्रशासनाने घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी live च्या माध्यमातून या निर्णयाची घोषणा केली.
राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थसहाय्यी विद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं सामंत म्हणाले.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील. विद्यार्थी आणि शिक्षकमंडळींच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असल्याची माहितीदेखील त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून दिली. परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार, जर एखादा विद्यार्थी काही कारणास्तव परीक्षा देऊ शकला नाही, तर त्याला पुन्हा परीक्षेची संधी देण्यात असल्याचं सामंत म्हणाले. प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापीठात हेल्पसेंटर चालू करण्याचे निर्देश देण्यात आलेत. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते त्वरित बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. जर विद्यार्थी परदेशी असला तर त्याला राहण्याची परवानगी असेल, पण परदेशी विद्यार्थ्यांनी नियमांचे कठोरपणे पालन केले पाहिजे, महाविद्यालयात लसीकरण कार्यक्रम राबवून सर्वांचे लसीकरण करून घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. ही नियमांची यादी खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार आहेत.
हे हि वाचा: