बीएमसी

लसीकरण न झालेल्यांना ऑक्सिजनच्या खाटांची गरज, पाहा नेमकं प्रकरण काय?

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्सिजनवर असलेल्या 2385 रुग्णांपैकी 96 टक्के रुग्णांची कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

Mumbai Oxygen beds : लस न घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. म्हणजेच आतापर्यंत एकही लस मुंबईमध्ये ज्यांनी घेतली नाही, अशा कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याची माहिती चहल यांनी दिली आहे.(Corona sufferers who have not been vaccinated need oxygen beds)

मुंबईच्या रुग्णालयातील खाटांमध्ये सध्या 35,645 कोव्हिड बेड्स आहेत. 6581 बेड्सवर कोरोनाची साधी लक्षणे असलेले रुग्ण उपचार घेत आहेत. तर ऑक्सिजनचे बेड्स आहेत 11950 आहेत, त्यापैकी 2385 रुग्णांना ऑक्सिजनच गरज भासत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्सिजनवर असलेल्या 2385 रुग्णांपैकी 96 टक्के रुग्णांची कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

बिकेसी कोव्हिड सेंटरचे अधिष्ठता डॉक्टर राजेश ढेरे यांनी दिलेली माहितीही खूप महत्त्वाची आहे. आपण घेतेलेल्या लसीमुळे आपल्या शरिरात अँटीबॉडिज् तयार होतात, त्यामुळे शरिरात गेलेल्या व्हायरसला मारण्याचं काम त्या अँटीबॉडिज करतात, येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये सावध राहणे खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण येत्या काही दिवसांतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक येणार असल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिली आहे, त्यामुळे जरी तुमचं लसीकरण पूर्ण झालं असलं तरी डबल मास्क वापरणे गरजेचे असल्याचं डॉक्टर म्हणतात.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शिकार तुम्हाला व्हायचं नसेल, तर तुम्हाला सर्वातआधी लसीचे दोन डोस पूर्ण करावे लागतील, त्यामुळे तुमच्या शरिरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज तुमचं संरक्षण करू शकतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments