आपलं शहरबीएमसी

Corona : मुंबईकरांसह धारावीने तिसऱ्या लाटेतही करून दाखवलं! तिसऱ्या लाटेतही धारावीत शुन्य कोरोना रुग्ण…

मुंबईत दिवसभरात 1,312 नवीन रुग्ण आढळले असून 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ( largest slum in Asia ) म्हणून प्रसिद्ध असलेली धारावी कोरोनाच्या मागील कोरोना लाटेत हॉटस्पॉट ( Corona hotspot in Dharavi ) बनली होती. धारावीकरांची साथ, धारावी मॉडेलची अंमलबजावणी ( Dharavi corona preventive model ) यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात आला होता यामुळे धारावी मॉडेलचे कौतुक देखील झाले होते. जागतिक आरोग्य संघटना असो अथवा केंद्र याकडून धारावी मॉडेलचे वेळोवेळी कौतुक झालं होतं. मात्र डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. मात्र महिनाभरातच धारावीतील कोरोना आटोक्यात आला असून आज शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

  • संक्रिय रुग्णात देखील घट

धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. २८ जानेवारीला शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८५८१ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ८१२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या ४३ सक्रिय रुग्ण आहेत.

  • मुंबईकरांना देखील दिलासा

दिवसभरात 1,312 नवीन रुग्ण आढळले असून 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 लाख 43 हजार 59 वर पोहोचली आहे. दरम्यान, 4,990 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 10 लाख 9 हजार 374 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 14 हजार 344 सक्रिय रुग्ण आहेत.

डिसेंबरमध्ये आलेल्या ओमायक्रोनमुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती. रात्रीचा कर्फ्यु देखील लावण्यात आला होता. जानेवारीच्या मध्यानंतर पुन्हा मुंबईत कोरोणाची रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे संकटात असलेले मुंबईकरांना हा दिलासा आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments