blog

बाळासाहेब ठाकरे यांचे हे 10 संदेश तुम्हाला माहिती आहेत का?

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...

याच दिवशी म्हणजेच 23 जानेवारी 1926 रोजी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म जाला. त्यांच्या तरुणपणात सुरु केलेल्या मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांनी अनेकांच्या मनात आपलं घर निर्माण केलं. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज जयंती संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. याच जयंतीनिमित्ताने साहेबांचे विचार समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांचे काही महत्त्वाचे आदेश, जे शिवसैनिकांना दिले जायचे, ते आपण आज समजून घेणार आहोत. ( Do you know these 10 messages of Balasaheb Thackeray? )

  1. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…
  2. रडायचं नाही लढायचं.
  3. हिंदूस्थानाच्या विरोधात कुणी उभं राहील तर त्याला जळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही.
  4. मुंबई कुणाच्या बापाची नाही. आपली आहे आपली आणि इथे आवाज ही आपलाच हवा.
  5. मराठीला ‘ व्हाय’ विचारण्याऱ्याला त्याची माय आणि बाप दाखवलाच पाहिजे .
  6. नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे होऊ हि महत्त्वाकांक्षा बाळगा!
  7. तरुणांमध्ये देशाभिमान भिनवायचा नसेल तर कशामध्ये भिनवायचा? मुल्सीपाल्टीच्या नळात ?
  8. वयाने म्हातारे झालात तरी विचाराने म्हातारे होऊ नका.
  9. शपथ घ्यायची असेल तर ही घ्या जसे ते एकवटले तसे आम्ही ही एकवटल्याशिवाय राहणार नाही.
  10. एकजुटीने राहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments