हेल्थ

Dolo 650 : डोलोची इतकी क्रेझ का, कोरोनाविरुद्ध डोलो कसा उपाय ठरतोय?

डोलो 650 ने ट्विटरवरही थैमान घातले आहे. डोलो 650 वरून नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स बनवत आहेत.

देशामध्ये कोरोनाच्या रूग्ण संख्येमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेची संपुर्ण देशात भीती पसरली आहे. मात्र रुग्णसंख्येचे प्रमाण जास्त असले तरी मृत्यूप्रमाण कमी आहे. त्यामुळे जनतेला थोडासा दिलासा आहे. मात्र तरी सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांची साथ ही देशात पसरली आहे. त्यामुळे लोक भीतीने कोरोना ची चाचणी करत आहेत. यावर शासनाकडून अशी चाचणी न करता घरूनच डॉक्टरांचे सल्ले घ्यावे असे सांगितले आहे. तसेच ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत त्यांना ही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये धावण्याची गरज नाही. त्यांनी घरीच आयसोलेशन मध्ये रहावे व योग्य ती काळजी घ्यावी. व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे सांगितले आहे. या उपचारादरम्यान डॉक्टरांकडून ‘डोलो 650’ या औषधाचा मोठया प्रमाणावर सल्ला दि्ल्याचे दिसून आले. तसेच रुग्णांवरही या औषधाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेवेळी ‘डोलो 650’ ची मागणी वाढली आहे. (Dolo 650: Why people have craze for dolo pill, how dolo is a remedy against corona?)

मात्र या डोलो 650 ने ट्विटरवरही थैमान घातले आहे. डोलो 650 वरून नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स बनवत आहेत. यांच्याकडून असे मिम्स शेअर केलेले पहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता ‘डोलो 650’ हा सध्याचा ट्रेंडींग मुद्दा आहे. तसेच घरोघरी कोविड किट असणे आवश्यक आहे. या किटमध्ये ही डोलो 650 औषधाचा समावेश आहे. त्यासोबत अजिथ्रोमायसिन 500मिलिग्राम, मॉन्टेक एलसी, व्हिटॅमिन सी तसेच झिंकोविट गोळ्या यांचा समावेश आहे. तसेच ओमायक्रोनला सौम्य लक्षणांमध्ये न घेता गंभीरतेने घेण्याचे निर्देश डब्ल्यूएचओ ने दिले आहेत. ओमायक्रॉनची साथ सध्या जगभरातील आरोग्यावर दबाव आणत असल्याची ही माहिती दिली आहे.

काय आहे डोलो 650?

डोलो 650 हे मायक्रो लॅब कडून बनवलेली औषधी आहे. ज्यामध्ये पॅरासीटामॉल चे प्रमाण आहे. डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, दातदुखी यांच्या उपचारासाठी वापरले जाते. मात्र हे औषध डोकरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments