Uncategorized

Sindhutai Sapkal death …या कारणामुळे झालं सिंधुताई सपकाळ यांचं निधन

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Sindhutai Sapkal death : अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताई सपकाळ यांनी मंगळवार दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 73 व्या वर्षी पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालविली.

त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केलाय. गॅलॅक्सि केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, “सिंधुताई यांना छातीचा हार्निया झाला होता.

सिंधुताई यांना त्यांच्या समाजकार्यासाठी 2021 मध्ये राष्ट्रपती रामनात कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. (Padma Shri in 2021 in Social Work category) याआधी 2012 साली महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 2010 साली महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊनही सिंधुताईंना सन्मानित करण्यात आलं होतं. अशाप्रकारे सिंधुताई यांना जवळपास 750 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्याचीही माहिती आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments