ED ने हजारो कोटींची संपत्ती केली जप्त, पहा 2021 चा आकडा किती
ईडीकडून राज्यात एका वर्षात तब्बल 2 हजार 167 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती काही राजकीय नेत्यांचीही आहे.

ED : 2021 या वर्षात ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने बऱ्याच लोकांचे खिसे रिकामे केले आहेत. ही किंमत एवढीतेवढी नव्हे तर चक्क 2 हजार 167 कोटी एवढी आहे. ईडीकडून राज्यात एका वर्षात तब्बल 2 हजार 167 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती काही राजकीय नेत्यांची, आमदारांची, काही चित्रपट सृष्टीतील कलाकारांची, काही बॅंका आणि कॉर्पोरेट क्षेत्रात घोटाळे करणाऱ्यांची असल्याची माहिती समोर येत आहे.
या वर्षात ईडीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. 2021 या वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे उघडकीस आले आहेत. फक्त महाराष्ट्रामधील व्यवसायिकांवरील कारवाई, बॅंक घोटाळे, राजकीय नेत्यांकडून केलेले घोटाळे या सर्वांमधून 2 हजार 167 कोटी एवढी संपत्ती जप्त करण्यात आली.
या नावांमध्ये शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांच्या संपत्तीचा समावेश आहे. तसेच खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांच्यावरही कारवाई केली गेली. तसेच पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी, कर्नाळा बँक घोटाळा. एचडीआयएल, डीएचएफएल अशी काही कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, वाधवान ग्रुप तर जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळा. या सर्वांकडून एकत्रित 2 हजार 167 कोटी एवढी संपत्ती 2021 या वर्षामध्ये ईडीने जप्त केली.