
देशाची गानकोकीळा लता मंगेशकर यांना अजून काही दिवस आयसीयू मध्ये रहावे लागणार असल्याची माहिती त्यांचे डॉक्टर प्रतीत सामदानी यांनी दिली आहे. तसेच चाहत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची गरज असण्याचे ही त्यांनी सांगितले. ( Empress Lata Mangeshkar in ICU for a few more days; Fans need prayer )
भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले गेले होते. त्यांचे सध्याचे वय 90 वर्ष एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे व न्यूमोनिया चा संसर्ग असल्यामुळे त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांचा उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार,’त्यांना अजून काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयू मध्येच ठेवले जाणार आहे. तसेच त्यांना अजून किती दिवस लागतील हे अजून निश्चित नाही. त्यांना भेटण्याची परवानगी कोणाला ही नाही. त्यांच्या आरोग्यासाठी चाहत्यांच्या प्रार्थनेची गरज आहे’ असे त्यांनी सांगितले.
हे हि वाचा: