आपलं शहरराजकारण

परीक्षा ऑफलाईन नको ऑनलाइन पाहिजेत ; विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन 

धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही.

मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी अनेक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. शाळा आणि कॉलेजचे शिक्षण ऑनलाइन घेतल्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घ्यावी यासाठी मुंबईतील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घरासमोर आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई, ठाणे, वसई अशा अनेक ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी आहेत. ( Exams should be online, not offline;  Students’ agitation outside the education minister’s house )

धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यंदा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, परीक्षा ऑफलाईन आणि वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नाही.

पोलीस प्रशासन या विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून, विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने, पोलिसांना बळाचा वापर करावा लागत होता.

परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत. संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणं योग्य नाही. विद्यार्थी संघटना, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्याशी मी उद्या बोलणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि संघटनांनी शांततेत घरी जावं अस आव्हान शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी केलं आहे.

गेल्या 2 वर्षापासून कोरोणा आहे तेव्हापासून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत होते. त्यांच्या परीक्षा ऑफलाईन का? राज्याचे अधिवेशन कोरोनामुळे कमी दिवस घेतलं जातं. कोरोनामुळे त्यांच्या बैठका ऑनलाइन होतात मग विद्यार्थी शाळेत येऊन परीक्षा का देतील. अस सवाल विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुलं घरून शिक्षण घेतायत मग फी का घेतली जातेय याचा देखील जाब आम्ही सरकारला विचारणार अस हिंदुस्थानी भाऊ म्हणाला.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments