
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवीन उपक्रम ‘ व्हॉट्सॲप चॅटबॉट’ लॉन्च केले आहे. यात मुंबईकरांना 80 हून अधिक विविध सेवा ऑनलाईन मिळतील. (Get everything BMC from WhatsApp, see method)
बीएमसीने म्हटले आहे की, चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना 80 हून अधिक सेवा आणि सुविधांची माहिती त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप क्रमांक 8999228999 द्वारे सहज उपलब्ध होईल. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, मुंबई ही देशातील पहिली महापालिका आहे जी व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून 80 हून अधिक सेवा लोकांना त्यांच्या दारापर्यंत पोहाचवेल. ते म्हणाले की ,“ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहला जाईल आणि क्रांतिदिन म्हणून या दिवसाचे वर्णन केले जाईल.’
या उपक्रमामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा अधिक सुलभ झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या सोहळ्यात महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि वरिष्ठ नागरी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “मुंबई महानगरपालिका आपल्या नागरिकांना 80 हून अधिक सेवा देत आहे आणि हे जगातील एकमेव उदाहरण आहे.” ते म्हणाले, “आज आपण ऑनलाइन, पारदर्शक आणि जबाबदार महापालिकेचे मॉडेल लोकांसमोर मांडले आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या हस्ते @mybmc WhatsApp chat bot चे लोकार्पण झाले, याचा अत्यंत आनंद वाटतो. इज ऑफ लिविंगला प्रशासनाने प्रथम प्राधान्य द्यावे, यावर माझा विश्वास असून त्या अनुषंगाने हे महत्वाचे पाऊल आहे. pic.twitter.com/XqkWdhJWy9
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 14, 2022
हे हि वाचा :