आपलं शहरमंत्रालयराजकारण

GOA ELECTION : भाजपाला सोडून शिवसेना इतर राज्यात मोठी होईल का? 

शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने बाहेरच्या राज्यात निवडणुका लढवू पाहत आहे.

शिवसेनेची स्थापन 1966 साली झाली. अगदी तेव्हापासून मुंबईतील मराठी माणूस आणि मराठी भाषा यासाठी लढत होते. हळू हळू महाराष्ट्राच्या बाहेर देखील हात पाय पसरायला लागलेली शिवसेना आता उत्तर राज्यात उतरली आहे. गोव्यामध्ये भाजपाची ताकत मोठी असताना, भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना मात्र  राष्ट्रवादीसोबत गोव्यात उतरली आहे. ( GOA ELECTION: Will Shiv Sena grow big in other states besides BJP? )

केवळ याच वर्षी नव्हे तर शिवसेनेने महाराष्ट्राच्या बाहेर लढण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत याअगोदर देखील शिवसेना उतरली होती परंतु त्यामध्ये त्यांचा पराभव झालेला दिसतो. प्रामुख्याने याअगोदर शिवसेनेने बंगालसह, उत्तरप्रदेश, कर्नाटक, गोव्यामध्ये लढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी प्रयत्न करत असताना भाजपा शतप्रतिषद सोबत होती पण आता ही शिवसेना भाजपाच्या विरोधात लढत असताना सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेला बाहेर आपले हातपाय पसरताना याअगोदर भाजपाची मदत होती. परंतु आता राष्ट्रवादीच्या मदतीने बाहेर समीकरण सुरू आहेत. शरद पवारांचे मन राखण्यासाठी सेना त्यांच्या सोबत आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

जवळपास 25 वर्ष शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणासह केंद्राच्या राजकारणात भाजपसोबत युती होती. परंतु 2019 साली मतभेद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी त्यांनी हातमिळवणी केली. 25 वर्षाच्या मित्र पक्षाला राम राम करत आपली वेगळी चूल मांडली खरी पण यावरून देखील टीका झाली.

सेनेला बाहेर आपली ताकद वाढवण्यासाठी अगोदर भाजपाची मदत घ्यावी लागली. आता शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने बाहेरच्या राज्यात निवडणुका लढवू पाहत आहे. सेनेने गोव्यात राष्ट्रवादी सोबत युतीकरून  10 ते 12 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी यश मिळालं तर सेना आणखी राज्यात लढू शकते अस अंदाज वर्तवला जात आहे.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments