नॅशनल

Air India चा पायलट होता, भारताचा पंतप्रधान; पगार पाहून थक्क व्हाल

एअर इंडियाच्या इतिहासात अशी एक गोष्ट लिहली जाईल की ती एअर इंडिया असेपर्यंत विसरली जाणार नाही.

Air India : सध्याच टाटा ग्रुपकडे गेलेल्या एअर इंडियाची चांगलीच चर्चा सुरु आहे. या चर्चांमध्ये अजून एक नाव जोडलं जात आहे. देशाचे एक माजी पंतप्रधानही होते, ज्यांनी एअर इंडियात पायलटची नोकरी केली. ते नाव म्हणजे राजीव गांधी. गांधी घराण्यातील शेवटचे पंतप्रधान म्हणून काम पाहणारे पंतप्रधान राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी पायलट होते.

डेहराडूनमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजीव परदेशात गेले. ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस होता. परंतु तेथे त्यांच मन रमलं नाही. दिल्लीला परत आल्यानंतर त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबमधून पायलट होण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली.

राजीव गांधींना इंडियन एअरलाइन्सने (Air India) पायलट म्हणून नोकरी दिली. राजीव गांधी हे अनेकदा दिल्ली ते जयपूर या मार्गावर विमान उडवायचे. यावेळी राजीव गांधी यांचा पगार 5,000 रुपये होता. त्यावेळी त्यांच्या आई इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, पण तरीही राजीव गांधींना पायलटची नोकरी आवडली.

एका मुलाखतीत त्यांनी असेही म्हटले होते की त्यांना उड्डाण करताना आनंद मिळतो आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून स्वातंत्र्य मिळते. संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधींनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या पायलटच्या कामगिरीवर परिणाम झाला. मात्र राजकारणात आल्यानंतर आणि अल्पावधितच चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना राजकारणातच राहण्याची सवय लागली.

राजीव गांधी यांच्या राजकारणातल्या अनेक गोष्टी किस्से म्हणून सांगितले जातात. मात्र पायलट आणि विमान उडवण्याच्या गोष्टींमुळे गांधी कुटुंबाला नंतर मोठी किंमत मोजावी लागली, हे नक्की

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments