आपलं शहरक्राईमघटनालोकल

Heroin Smuggling in Mumbai : मुंबईत 3 कोटी किमतीच्या हेरॉईन सोबत पकडला गेला 65 वर्षीय वृद्ध तस्कर ,पहा ANC ने कसा रचला सापळा…

मुंबईतील अमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) राजस्थानमधील एका 65 वर्षीय व्यक्तीला 3 कोटी रुपयांच्या हेरॉईनसह अटक केली आहे.

मुंबईतील अमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) राजस्थानमधील एका 65 वर्षीय व्यक्तीला 3 कोटी रुपयांच्या हेरॉईनसह अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , आरोपीचे नाव प्यारे अमानुल्लाह खान असे असून तो मूळचा राजस्थानमधील प्रतापगढचा आहे. त्यांनी सांगितले की, ANC ला गुप्त माहिती मिळाली होती की राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मुंबईला रेल्वे आणि रस्त्याने नेले जात आहे. पुरवठा केला जात आहे. त्यानंतरच शनिवारी एएनसीने आरोपीला अटक केली.

(Heroin Smuggling in Mumbai: 65 year old smuggler caught with heroin worth Rs 3 crore in Mumbai, see how ANC set a trap …)

या माहितीवर कारवाई करत, ANC टीमने उपनगरीय बोरिवलीमध्ये सापळा रचला आणि ड्रग्ज वितरणासाठी आलेल्या वृद्धाला 3 कोटी रुपयांच्या एक किलो हेरॉईनसह पकडले, असे अधिकाऱ्याने सांगितले. अंमली पदार्थ तस्कर अमानुल्लाह खान याला एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या आरोपीला 19 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

हे हि वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments