बीएमसी

Home Quarentine : होम क्वारंटाईनचे नियम बदलले, लक्षणे पाहून क्वारंटाईनचे आदेश

मुंबईत कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढतेय. मात्र या रुग्णांमध्ये तितकी लक्षणे नाहीत, ज्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज भासेल

Home Quarentine : मुंबईत कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्ण संख्या वाढतेय. मात्र या रुग्णांमध्ये तितकी लक्षणे नाहीत, ज्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज भासेल. त्यामुळे मुंबईतील अनेक रुग्ण होमक्वारंटाईन आहेत. अशातच मुंबई पालिकेने होम क्वारंटाईनचे नियम बदलले आहे. ते नियम नेमके कोणते आहेत, हेच आपण पाहणार आहोत.

कोण राहू शकतं होम क्वारंटाईन

सर्वात प्रथम, ज्यांच्या घरामध्ये विलिगीकरणाची योग्य सोय आहे.

ज्यांना कोरोना किंवा ऑमिक्रॉनची लागण आहे,मात्र त्यांच्यामध्ये ज्यादा लक्षणे नाहीत, असे लोक होम क्वारंटाईन राहू शकतात.

ज्या रुग्णांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी 94 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

जे रुग्ण 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील आहेत

ज्यांच्याजवळ अनेक आरोग्य सुविधा लगेच उपलब्ध होऊ शकतात

कोणाला राहता येणार नाही

कॉमोरबीडिटीज रुग्णांना राहता येणार नाही

डायबेटिक, हायपर टेन्शन, हृदयाचा आजार ,किडनीचा आजार अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरी राहता येणार नाही

रोगप्रतिकारक क्षमता कमी असेलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन राहता येणार नाही

हेही वाचा : 

Mumbai Corona Update :157 खासगी रुग्णालये पालिकेच्या ताब्यात…

20 हजार रुग्णांचा आकडा पार, आता लॉकडाऊनचं काय होणार

मुंबईतील शाळांवर पुन्हा बंद राहण्याची वेळ, राज्यात 15 ते 18 वयोगटांच्या लसीकरणाला सुरुवात

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments