कोरोनाकाळातही लग्नाची घाई? कोणत्या महिन्यात किती मुहूर्त? पाहा एका क्लीकवर…
गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या येणाऱ्या लाटांमुळे लग्न सोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. केव्हा लग्नाला 50 जणांची उपस्थिती तर केव्हा 100 जणांमध्ये लग्न.

मार्च 2020 पासून कोरोनाचे सावट जगावर आणि देशावर घोंगावत आहे. कोरोनामध्ये अनेकांची कामे गेली तर काहींचे उद्योगधंदे बंद पडले. यावर उपाय म्हणून अनेकांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले होते. कोरोनाच्या काळात अनेक घटकांना फटका बसला त्यापैकी एक घटक म्हणजे विवाह सोहळे. (How many wedding moments are there in the year 2022)
गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या येणाऱ्या लाटांमुळे लग्न सोहळ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. केव्हा लग्नाला 50 जणांची उपस्थिती तर केव्हा 100 जणांमध्ये लग्नामुळे तरुणांची मोठी हिरमोड झाली. मुंबईकरांसाठी तर लग्नसराई डोके दुःखी ठरली होती. लग्न नियमाप्रमाणे होत नसेल आणि लग्नाच्या ठिकाणी पालिकेची धाड पडली तर दंड आकारला जात होता.
आता कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता येताच अनेकांनी लगीन घाई सुरू केली आहे. विशेषतः मुहूर्त लागून आल्याने मुंबईसारख्या शहरांसह ग्रामीण भागातही लग्नाचा बार मोठ्या प्रमाणात उडवून दिला जात आहे. यंदाच्या नवीन वर्षात 12 महिन्यांपैकी 09 महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया कोणत्या महिन्यात किती आहेत मुहूर्त?
कोणत्या महिन्यात किती मुहूर्त?
फेब्रुवारी – 5, 6, 7, 10, 17, 19,
मार्च – 25, 26, 27, 28,
एप्रिल – 15, 17, 19, 21, 24, 25,
मे – 04, 10, 14, 18, 20, 21, 22, 25, 26, 27,
जून – 01, 6, 8, 11, 13, 14, 16, 18,
जुलै – 3, 5, 6, 7, 8,9,
नोव्हेंबर – 24, 27, 28, 29,
डिसेंबर – 2, 4, 8, 9, 14, 16, 1 7, 18,
हेही वाचाच
माझगाव डॉकमध्ये तयार झालेल्या पाणबुडी झळकणार राजपथावर
देश स्वातंत्र्य झाला, परंतु शकुंतला अजूनही पारतंत्र्यात
‘सलमान अजून अंड्यात आहे’; Big Boss मधून बाहेर येतात, सलमानवर आरोप,