
या वर्षीच्या ICC अवॉर्डस् मध्ये अंतरराष्ट्रीय खेळात आपली चोख कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचे गौरव करण्यात आले आहे. ICC Men’s T-20 वर्ल्ड कप पासून ते महिलांचे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा. विविध खेळांच्या स्पर्धेने 2021 हे वर्ष अतिशय स्मरणार्थ ठरले आहे. ( Icc Award: List of the best players in the world, which players are from India )
दक्षिण आफ्रिकेच्या जेनेमन मलानच्या उदयापासून ते टॅमी ब्युमॉन्टच्या टी-20 कारनामा आणि झीशान मकसूदच्या चतुर नेतृत्वापर्यंत , आंतरराष्ट्रीय खेळाने अनेक चेहरे पाहिले आहेत त्यातले काही नवीन आहे तर काही जुने ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर त्यांची छाप उमटवली आहे. याच खेळाडूंचे गौरव करण्यासाठी त्यांना सन्मानित केले गेले आहे.
पाहूया कोण ठरले या अवॉर्डचे मानकरी
- आयसीसी मेन्स टी20 क्रिकेटर ऑफ द इयर – मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
- आयसीसी वुमन्स टी20 क्रिकेटर ऑफ द इयर – टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड)
- आयसीसी मेन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर – जनेमन मलान (दक्षिण आफ्रिका)
- आयसीसी वुमन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर – फातिमा सना (पाकिस्तान)
- आयसीसी मेन्स असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर – जिशान मकसूद (ओमान)
- आयसीसी वुमन्स असोसिएट क्रिकेटर ऑफ द इयर – आंद्रे झेपडा (ऑस्ट्रीया)
- आयसीसी मेन्स वनडे क्रिकेटर ऑफ द इयर – बाबर आझम (पाकिस्तान)
- आयसीसी वुमन्स वनडे क्रिकेटर ऑफ द इयर – लीझल ली (दक्षिण आफ्रिका)
- आयसीसी मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर – जो रुट (इंग्लंड)
- आयसीसी वुमन्स क्रिकेटर ऑफ द इयर – स्मृती मंधाना (भारत)
- आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर – शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)
- आयसीसी अम्पायर ऑफ द इयर – मारेस इरास्मस
हे ही वाचा:
- Mumbai School Reopen : शाळा सुरु, आता राज्य सरकारचे नवे नियम काय?
- Balasaheb Thakarey : बाळासाहेबांच्या पहिल्या रॅलीमध्ये 5 लाख लोक कसे आले?
- बाळासाहेब ठाकरे यांचे हे 10 संदेश तुम्हाला माहिती आहेत का?