लोकल

Double Decker Bus : मुंबईच्या रस्त्यांवर धावणार सगळ्यांची आवडती गाडी, हवाहवाईचं नवं रुप येणार

मुंबईमहानगर पालिका मुंबईतील जनतेच्या सोयीसाठी नवनवीन सेवा उपलब्ध करून देत आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसी बसची संख्या वाढवली आहे.

Double Decker Bus : मुंबईमहानगर पालिका मुंबईतील जनतेच्या सोयीसाठी नवनवीन सेवा उपलब्ध करून देत आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसी बसची संख्या वाढवली आहेच, परंतु मुंबईकरांचा प्रवास आणखी सोयीस्कर व्हावा यासाठी डबल डेकर बसदेखील बेस्टच्या ताफ्यात सामील होत आहेत. डबलडेकर बसचा मुंबईकरांना एक नवीनच अवतार बघायला मिळणार आहे. या बसेस पूर्णपणे विजेवर धावणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रवास सुलभ, जलद आणि स्वस्त होणार आहे. (What means double-decker)

बेस्ट समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत 200 दुमजली बसगड्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. बेस्ट समितीतील विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी भूमिका मांडून मुंबईकरांच्या सुविधेसाठी अधिक दुमजली बस घेण्याची उपसूचना मांडली. त्यानुसार 200 दुमजली बस आणि इतर मिळून 900 बसेसचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दोन कंपन्यांकडून 12 वर्षांसाठी या बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. या वर्षाच्या शेवटपर्यंत 25 टक्के म्हणजे 225 दुमजली बसेस ताफ्यात दाखल होतील. त्यानंतर 50 टक्के बस येतील. 18 ते 21 महिन्यांत या बसेस उपक्रमाच्या सेवेत येतील, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. (Why doesn’t the US have double-decker buses)

भाजपचा आक्षेप

बेस्टच्या समितीत गुरुवारच्या बैठकीत बसची संख्या वाढवून 900 करण्यात आली. त्यावर मत मांडण्यास संधी देण्यात आली नाही. बसची संख्या दुपट्टीने वाढल्याने त्यासाठी 3,200 कोटी रुपये खर्च केले जातील. या निवेदनातील त्रुटी गंभीर आहेत. दुमजली बससाठी दोन कंपन्यांची निवड झाली असून त्यांनाच जाहिरातींचे कंत्राट दिले जाणार आहे, असा आरोप बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणचार्य यांनी केला. (Which is the India’s double-decker)

सध्या केवळ 48 डबलडेकर

काही वर्षांपूर्वी डबलडेकर बस मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या संख्याने धावताना दिसायची. मात्र वेळेनुसार या गाड्यांची वाहतूक कमी करण्यात आली. वयोमानानुसार कालबाह्य ठरलेल्या गाड्या हटवण्यात आल्या. बेस्टकडे 15 वर्षांपूर्वी 901 दुमजली बस, तर डिसेंबर 2019 पर्यंत डबलडेकरची संख्या 120 होता. आता 48 विनावातानुकुलित डबलडेकर बस बेस्टकडे आहेत. (Why is it called a double-decker)

प्रवासी क्षमतेत वाढ

एका डबलडेकर बसची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 78 इतकी आहे. यात 65 आसन क्षमता तर उर्वरित उभ्याने प्रवास करू शकतात. तर एकमजली मोठ्या बसची प्रवासी क्षमता ही 54 असून यात 45 प्रवासी आसन क्षमता आहे. तर मिनी बसमध्ये 42 प्रवासी नेण्याची क्षमता असून 24 आसन क्षमता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments