India Corona News : देशात कोरोनाचा थैमान, 7 दिवसांत संख्या लाखोंपार…
नववर्षाच्या 7 व्या दिनी ही रूग्ण वाढ 1,17,100 च्या संख्येस जाऊन धडकली.

नववर्षाच्या सुरुवातीपासून कोरोनाने प्रचंड वेग प्राप्त केले आहे. फक्त गेल्या 7 ते 8 दिवसांच्या कालावधीत कोरोनाने देशात लाखोंचा टप्पा पार केला आहे. 1 जानेवारीला कोरोना रूग्णसंख्या 22,775 होती. जी 2 तारखेला 27,553 ला पोहचली. 3 जानेवारीच्या दिवशी रुग्ण संख्या 33,750 होती. जसे जसे दिवस जात आहेत त्याचप्रमाणे कोरोना बाधितांची संख्या ही वाढत आहे. 4 जानेवारीला देशात कोरोनाची संख्या 37,379 पोहचली. 5 जानेवारीला या संख्येने 50,000 चे अर्धशतक पार करून रूग्णवाढ 58,097ला पोहचली. 5 ते 6 जानेवारी दरम्यान कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आणि संख्या 90,998 ला पोहचली. नववर्षाच्या 7 व्या दिनी ही रूग्ण वाढ 1,17,100 च्या संख्येस जाऊन धडकली.(India Corona News: Corona Thaman in the country, number crossed millions in 7 days …)
तिन्ही लाटांची लक्षरुग्ण कालावधीचा कालखंड पाहिला तर तिसऱ्या लाटेत फक्त 10 दिवसात कोरोनाने लाखोंची संख्या पार केली. पहिल्या लाटेत रुग्णवाढींची संख्या लाखोंपर्यंत पोहचण्यासाठी 120 दिवसांचा कालावधी लागला होता. दुसऱ्या लाटेने हीच संख्या मात्र 50 दिवसात पार केली. यामानाने, तिसऱ्या लाटेचा फैलाव हा पाहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक आहे.
रुग्णवाढीचा आलेख गेल्या सात दिवसांत सर्वाधिक उसळला असून त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. राज्यात दिवसभरात सुमारे 41,000 नवे रुग्ण आढळले असून मुंबईत 20,947 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
हे हि वाचा :