आपलं शहरस्पोर्ट

IPL 2022 मुंबईमध्ये रंगण्याची शक्यता; मात्र येऊ शकतात ‘या’ अडचणी

अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की, एकाच शहरात सर्व सामने भरवले की मोठी अडचण उपस्थित होऊ शकते .

आयपीएल 2022 च्या ठिकाणांबाबत बराच गोंधळ सुरू होता . ज्याप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता, तसे आयपीएल 2022 चे ठिकाण बदलण्याचे ही विचार चालू होते . या दरम्यान , या वर्षी पुन्हा दुबईमध्ये आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते, अशा बातम्याही येत होत्या . त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेतही आयपीएल आयोजित केल्याची बातमी समोर आली होती. आता शनिवारी बीसीसीआयच्या बैठकीनंतर आयपीएलचे आयोजन भारतातच होणार असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयने एक प्रेस नोटही जारी केली आहे, ज्यामध्ये आयपीएलच्या आयोजनात भारताला प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. भारताबाहेरील ठिकाण हे प्लॅन बी चा भाग आहे. या बैठकीनंतर मीडिया सूत्रांनी असाही दावा केला आहे की, आयपीएल 2022 भारतात आयोजित करण्यावर काम सुरू झाले आहे, संपूर्ण कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. मुंबईत दोन स्टेडियम आहेत, ज्यावर आयपीएलचे सर्व सामने होणार असल्याचा दावाही यापूर्वी करण्यात आला होता. त्याचबरोबर पुण्यातील मैदानाचाही पर्याय म्हणून वापर करता येईल. असे करण्यामागील कारण म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने आयोजित केल्यावर खेळाडूंना वेगळा प्रवास करावा लागतो. त्याच शहरात कार्यक्रम आयोजित केल्यास प्रवासाचा त्रास होणार नाही. अशा परिस्थितीत, कोरोना संसर्गाचा धोका खूप कमी होईल.

(IPL 2022 likely to be played in Mumbai; However, these problems can occur)

अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे की, एकाच शहरात सर्व सामने भरवले की मोठी अडचण उपस्थित होऊ शकते . वास्तविक, आयपीएलमध्ये एक महिना सलग सामने होतील. मैदाने निवडल्यास जवळपास रोज त्याच मैदानावर सामने घ्यावे लागतील. अश्यात पीच मेन्टेन करण्यात बऱ्याच अडचणी येऊ शकतात. वास्तविक, कसोटी सामन्यातच सलग पाच दिवस खेळल्यानंतर शेवटच्या दिवशी पीच तुटायला लागते, तर एका महिन्याहून अधिक काळ एकाच पीच वर सामने कसे खेळवले जातील आणि त्याची देखभाल कशी होणार? अशा परिस्थितीत जेव्हा पीच तुटायला लागते तेव्हा फलंदाजी करणे खूप कठीण होईल. या स्थितीत संघ काय रणनीती आखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments