स्पोर्ट

IPL 2022 Update : …म्हणून मुंबईत रंगणार IPL 2022 चे सगळे सामने

गेल्या दोन वर्षांच्या कोरोनामुळे याच स्पर्धेवर अनेक संकट होती. IPL सुरू झाली की काळजी असते, पूर्ण होणार की अर्धवट संपणार.

IPL 2022 Update : नवीन वर्ष सुरु झालं की तरुणांना वेध लागत ते म्हणजे आयपीएलचं. आयपीएलचा लिलाव केव्हा आणि सुरु केव्हा होणार याबाबत महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशाला याची आतुरता असते. गेल्या दोन वर्षांच्या कोरोनामुळे याच स्पर्धेवर अनेक संकट होती. IPL सुरू झाली की काळजी असते, पूर्ण होणार की अर्धवट संपणार. यांमुळे भारतीय नियमाक मंडळ म्हणजे BCCI कोणतेही व्यत्यय येऊ नयेत म्हणून संपूर्ण तयारीसाठी वेळ घेऊन निर्णय घेत आहे. (All the Matches of IPL 2022 will be Played in Mumbai)

आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमावर कोरोनाचे सावट असल्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा एकट्या मुंबईतच आयोजित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत बीसीसीआयने (BCCI) दिले आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे ही स्पर्धा मुंबई आणि पुणे या दोन शहरांत होणार होती, परंतु कोरोनाचे रुग्ण केव्हाही वाढू शकतात, यामुळे एकाच शहरात IPL चे आयोजन करण्याचा BCCI चा बेत आहे.

आता पुण्याचा पत्ता कट होणार असल्याचे संकेत मिळत असून केवळ मुंबई आणि नवी मुंबईतील मैदानांवरच ही संपूर्ण स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा पुढील काही दिवसांत केली जाणार असल्याचे म्हटले जातं आहे.

यंदाच्या मोसमातील आयपीएलमधील सर्व सामने मुंबईतच आयोजित करण्यावर बीसीसीआयच्या बैठकीत सहमती झाली आहे. मुंबईत स्टेडियमची संख्या जास्त आहेत तसेच अन्य अत्यावश्‍यक सुविधांचा विचार करता ही स्पर्धा येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियम आणि त्याच्याच बाजूचे ब्रेबोर्ण स्टेडियम आणि नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियमदेखील उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

ही तिन्ही स्टेडियम असल्याने यामुळे खेळाडूंना विमानाने प्रवास करण्याची गरज पडणार नाही. यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल. तसेच मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलची संख्या देखील जास्त आहे. यामुळे खेळाडूंना राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तीथेच बायोबबलची निर्मिती सहजपणे केली जाऊ शकते.

बीसीसीआयला आयपीएलच्या मागच्या मोसमात झालेल्या चुका टाळायच्या आहेत, त्यामुळेच स्पर्धेसाठी एकच शहर निवडले जाणार आहे. गेल्या वर्षी आयपीएलचे आयोजन भारतातील 6 ठिकाणी करण्यात आले होते. तेव्हा अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांची निवड करण्यात आली होती; पण खेळाडूंना करोना झाल्याने ही स्पर्धा मध्येच स्थगित करावी लागली आणि दुसरा टप्पा सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये अमिरातीत आयोजित करावा लागला होता या चुका पुन्हा होऊ नये यासाठी BCCI काळजी घेत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments