घटना

मुंबईमध्ये कोरोनाचा पीक येऊन गेला? वैज्ञानिकांचा ‘हा’ दावा सर्वात महत्त्वाचा

मुंबईमध्ये कोरोना पसरण्याचा काळ संपण्याच्या वाटेवर आहे. आणखी दोन आठवडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शेवट होण्याची वाट पाहावी लागणार असल्याचं मतही डॉ. पांडा यांनी व्यक्त केले आहे.

Corona Third Wave :  दिल्ली, महाराष्ट्र आणि खासकरून मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मुंबईसह काही भागात कोरोनाची तिसऱ्या लाटेने हुलकावणी दिली आहे. अशा परिस्थितीत मुंबई आणि दिल्लीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक आलाय का, असाही सवाल विचारला जात आहे. आयसीएमआरचे शास्त्रज्ञ डॉ. समीरन पांडा यांनी याबद्दल काही माहिती दिली आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, डॉ. समीरन पांडा यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक आलाय की नाही, याचं उत्तर लवकरच मिळणार आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णांचं केलं जाणार निदान यामुळे मुंबईत पसरलेल्या कोरोना आणि ओमिक्रॉनवर लवकरच पूर्णविराम लागू शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईमध्ये कोरोना पसरण्याचा काळ संपण्याच्या वाटेवर आहे. आणखी दोन आठवडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शेवट होण्याची वाट पाहावी लागणार असल्याचं मतही डॉ. पांडा यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments