आपलं शहरलोकल

रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडणंही झालं सोप्प; उगाच जीव धोक्यात घालू नका

मुंबईत धावपळीच्या वेळेत अनेकजण रेल्वे रूळ ओलांडून आपला जीव गमावतात त्यामुळे मुंबईकरांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे.

मुंबईकरांसाठी मुंबईची लोकल लाईफ लाईन आहे. हीच लाईफलाईन मुंबईकरांना वेळोवेळी अत्याधुनिक सुविधा देत असते. मग ती मध्य रेल्वे असो अथवा पश्चिम रेल्वे. दिवसाला जवळपास लाखोंच्यावर प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवासी प्रवास करत असताना मोठया प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते. असे अनेक लोक आहेत जे रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासन मुंबई पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवर नवीन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ( It was easy to get out of the train station; Don’t risk your life)

मुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी तब्बल 14 सरकते जिने आणि उद्वाहक बसवण्यात येणार आहे. याचे कारण म्हणजेच गर्दीच्या वेळी प्रवासी वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकून रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रयत्न करतात आणि ओलांडतात सुध्दा. रूळ त्यामुळे कित्येकांचा बळी देखील गेला आहे. या सरकत्या जिन्यामुळे आणि उद्वाहकामुळे हे प्रमाण जरा कमी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. याचा दुसरा फायदा म्हणजे वृद्ध व्यक्तींना,अपंग व्यक्तींना आणि गरोदर असेलेल्या महिलांना देखील होईल. या प्रकल्पाचा उपयोग करून लोकांचा वेळ ही वाचेल. सध्या पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकांवर 74 सरकते जिने आणि 29 उद्वाहक आहेत.

उपनगरीय स्थानकांमध्ये मार्च 2022 पर्यंत आणखी 10 सरकते जिने आणि चार उद्वाहक बसविण्यात येणार आहेत. वांद्रे स्थानकात 1 उद्वाहकासह 2 स्वयंचलित जिने बसवण्यात येणार आहे तर वांद्रे टर्मिनस वर 2 स्वयंचलित जिने बसवण्यात येणार आहे. गोरेगाव स्थानकावर 2 उद्वाहाक आणि 2 स्वयंचलित जिने बसवण्यात येणार आहे. यासोबत, जोगेश्वरी स्थानकात एक, मालाड आणि बोरिवली स्थानकात प्रत्येकी एक जिन्याचा समावेश आहे. कांदिवली स्थानकात एक उद्वाहक बसवण्यात येणार आहे. – सुमित ठाकूर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.

जानेवारी 2020 मध्ये मुंबई सेंट्रल स्थानकात 2 आणि मरीन लाइन्स स्थानकात 1 सरकता जिना बसवण्यात आले होते. या उपक्रमात प्रत्येकी जिन्यावर तब्बल 1 कोटींचा निधी खर्च करण्यात आला. बोरिवली आणि जोगेश्वरी स्थानकातील 2 स्वयंचलित जिने जानेवारीच्या उत्तरार्धात सुरू होतील. त्यांची देखील लवकरच सेवा सुरू करू असं सुमित ठाकूर म्हणाले.

मुंबईत धावपळीच्या वेळेत अनेकजण रेल्वे रूळ ओलांडून आपला जीव गमावतात त्यामुळे मुंबईकरांसाठी हा निर्णय महत्वाचा आहे.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments