Uncategorized

Jijamata Udyan : राणीच्या बागेत 106 कोटी रुपयांचा घोटाळा; थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र

मुंबई महापालिकेत कंत्राटदारांच्या टोळीने आता परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याचे टेंडर काढले आहे. राणीबागेत जॅग्वार, चिता, पांढरा सिंह, चिंपांझी यांसारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

Jijamata Udyan : राणीच्या बागेत परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याच्या निविदेत 106 कोटी रुपयांची अनियमितता झाली असून ही निविदा प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई महापालिकेतील भाजप नेते विनोद मिश्रा यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने चौकशी करावी, अशी मागणी मिश्रा यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे. (Which animals are there in Byculla zoo?)

मुंबई महापालिकेत कंत्राटदारांच्या टोळीने आता परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याचे टेंडर काढले आहे. राणीबागेत जॅग्वार, चिता, पांढरा सिंह, चिंपांझी यांसारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई पालिकेने निविदा मागवल्या आहेत. महापालिकेच्या नियमानुसार 100 कोटींहून अधिक रकमेच्या निविदेत सहभाग घेता येतो, त्यामुळे 185 कोटींच्या निविदेचे दोन भाग झाले आहेत. या निविदेत अनियमितता होत असून, 100 कोटींहून अधिकच्या निविदा ठेकेदाराकडून भरल्या जाणार असल्याचे विनोद मिश्रा यांनी म्हटले आहे. (What is the entry fees of Rani Bagh?)

प्राणी संग्रहालयातील निविदा हा हायवे या कंपनीला 91 कोटी आणि स्कायवे 94 कोटी नावाच्या अशा स्वरूपात दिला आहे. कंपन्यांनी अंदाजित दराने 60 टक्क्यांहून अधिक म्हणजे 100 कोटींहून अधिक रक्कमेच्या निविदा भरल्या आहेत. अशाप्रकारे महापालिकेत पद्धतशीरपणे 106 कोटींहून अधिकचा घोटाळा होण्याची शक्यता आहे. असं सदस्य विनोद मिश्रा यांच म्हणणं आहे. (Is Rani Baug Byculla open?)

राणीच्या बागेतील पेंग्विन हे सत्ताधाऱ्यांवर विरोध करण्याचे कायमचे अस्त्र होते. आता तर राणीच्या बागेत प्राणी खरेदी करण्यासाठी काढण्यात आलेला निविदामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप या अगोदरदेखील भाजपाने केला होता. तसेच या दोन्ही कंपनीला दिलेल कॉन्ट्रॅक्ट हे बेकायदेशीर आणि योग्य पद्धतीने  नसल्याचं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले होते. (Is Byculla zoo worth visiting?)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक जवळ आली आहे, याच अनुषंगाने सत्ताधारी शिवसेनेला चहूबाजूने घेरण्याचे काम भाजपकडून सुरू झालेल दिसून येत असून येत्या निवडणुकीत याचा फायदा भाजपला होतो का हे पाहणं महत्वाचं असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments