Uncategorized

Kalwa -Mumbra Kharegav Railway Crossing: अखेर बंद झाले खारेगाव रेल्वे क्रॉसिंग, नक्की काय आहे नवीन उड्डाण पुलाचा लोकल साठी फायदा…

या पुलाची मागणी 2000 साली करण्यात आली होती. 2008 साली या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी मिळाली असून, 2014 साली पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. 2022 च्या 15 जानेवारी दिनी पुलाचे उद्घाटन करून सर्व सामान्यांसाठी हा पूल सुरू केला गेला.

कळवा-मुंब्रा मधील खारेगाव रेल्वे फाटक अखेर बंद करण्यात आले आहे. या रेल्वे फाटकावर वाहन क्रॉसिंग आणि पब्लिक क्रॉसिंग साठी मोठा फ्लायोवर तयार करण्यात आले आहे. कळवा-मुंब्रा मध्ये होणारे शहरीकरण पाहता तेथील रेल्वे फाटक बंद करून कोणत्याही अडथळ्याशिवाय लोकल सुरळीत चालणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे हे फाटक बंद करण्यात आले आहे. येथील रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहबांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाले आहे. रेल्वे उडाणपुलाच्या उद्घाटनाबरोबरच मध्य रेल्वेने लेबल क्रॉसिंग बंद केले आहे. मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार म्हणाले की, हे व्यस्त रेल्वे फाटक बंद केल्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारेल. (Kalwa -Mumbra Kharegav Railway Crossing: Kharegaon Railway Crossing finally closed, what exactly is the benefit of the new flyover for locals …)

या पुलाची मागणी 2000 साली करण्यात आली होती. 2008 साली या प्रस्तावास शासनाकडून मंजुरी मिळाली असून, 2014 साली पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. 2022 च्या 15 जानेवारी दिनी पुलाचे उद्घाटन करून सर्व सामान्यांसाठी हा पूल सुरू केला गेला. स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, “कळव्यातील या उड्डाणपूलानंतर पुढील लक्ष्य हे दिव्यात लवकरात लवकर उड्डाणपूल बांधणे असेल.” या उड्डाणपुलांसाठी मध्य रेल्वे आणि ठाणे महानगरपालिकेने 35 करोड रुपये खर्च केले आहेत.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments