बीएमसी

किशोरी पेडणेकर PPE घालून पोहचल्या Covid Care Centre मध्ये

जम्बो कोव्हिड सेंटरच्या वॉर रुमला भेट देऊन महापौरांनी पाहणी केली.

Kishori Pednekar : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील करोना रुग्णसंख्या 20 हजारांच्या पार गेली आहे, यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. यावरच किशोरी पेडणेकर यांनी माध्यमाशी संपर्क साधून महत्त्वाची माहिती दिलीये. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बिकेसी येथील जम्बो कोव्हिड सेंटरला भेट दिली.

जम्बो कोव्हिड सेंटरच्या वॉर रुमला भेट देऊन महापौरांनी पाहणी केली. यानंतर स्वतः पीपीइ किट घालून महापौरांनी थेट कोव्हिड वॉर्डमध्ये प्रवेश केला. यावेळी रुग्णांशी बातचीत करून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनदेखील महापौरांकडून करण्यात आलं.

दुसऱ्या लाटेमध्येदेखील महापौरांनी PPE किट घालून रुग्णांशी बातचीत केली होती, मुंबईत रुग्ण कमी होते, तेव्हा बिकेसी कोव्हिड सेन्टर बंद ठेवण्यात आलं होतं, परंतु रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा हे सेन्टर सुरू करण्यात आलं आहे, रुग्णांची कशी देखभाल केली जातेय, कसे उपचार दिले जातायत हे पाहण्यासाठी महापौरांनी सेंटरला भेट दिली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments