Uncategorizedनॅशनल

LPG Cylinder :नवीन वर्षाच्या प्रारंभी एलपीजी गॅसच्या नव्या किमती जाहीर, जाणून घ्या नव्या किमती …

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 102.50 रुपयांनी कमी केल्या आहेत.

नवीन वर्षात LPG ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 102.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. नवीन किमती 1 जानेवार 2022 पासून लागू होतील. तथापि, घरगुती एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 1 डिसेंबर रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 103.50 रुपयांनी वाढल्या होत्या. (LPG Cylinder: New LPG gas prices announced at the beginning of the new year, find out the new prices…)

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किमती

IOC नुसार, 1 जानेवारी 2022 रोजी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 102.50 रुपयांनी कमी होऊन 1,998.5 रुपयांवर आली आहे. मुंबईत 19 किलोचा एलपीजी सिलेंडर 102.50 रुपयांनी कमी होऊन 1,948.5 रुपये, कोलकात्यात 101 रुपयांनी 2,076 रुपये आणि चेन्नईमध्ये 103.50 रुपयांनी 2,131 रुपयांवर आला आहे.

घरगुती एलपीजीमध्ये कोणताही बदल नाही

तेल विपणन कंपन्यांनी अनुदानाशिवाय 14.2 किलो LPG सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. राजधानी दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर 899.5 रुपयांना, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये एलपीजी अनुक्रमे 899.5 रुपये, 926 रुपये आणि 915.5 रुपयांना उपलब्ध आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments