Uncategorized

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रातील कोरोणाची तिसरी लाट केव्हा संपणार? राजेश टोपेंनी दिली माहिती…

राज्यात दिवसभरात 50 हजार 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या 2 लाख 44 हजार 344 इतकी झाली आहे.

2020 पासून कोरोनाला सूरवात झाली तेव्हापासून अनेकजण कोरोनाशी दोन हात करत आहेत. नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. नोव्हेंबरपर्यंत आटोक्यात आलेला कोरोनाने डिसेंबरपासून नव्याने डोकं वर काढले. राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच ओमायक्रॉनचे देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याच पाश्र्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लागू आहेत. ( Maharashtra Corona Update : When will the third wave of Corona in Maharashtra end? Information given by Rajesh Tope … )

याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार? याविषयीही माहिती दिली. यावेळी कोरोनाच्या नवीन न्यूकॉन व्हेरिंयटविषयी बोलत असतांना राजेश टोपे म्हणाले की, हा व्हेरियंट धोकायदायक आणि घातक असल्याचे म्हटले जात आहे. परंतु राज्यातील आरोग्य यंत्रणा या विषाणुचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे,  असे टोपे म्हणाले. तसेच कोरोनाची तिसरी लाट ही मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल, अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपेयांनी दिली.

इतर देशांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आलेली आहे, तसेच निर्बंध देखील कमी करण्यात आले आहेत. परंतु भारतामध्ये कोरोनासोबत जगण्यासाठी नवी नियमावली बनवायला हवी असे टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान राज्यात दिवसभरात करोनाच्या 22 हजार 444 नवीन रुग्णांची नोंद झाली व 50 रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात दिवसभरात 50 हजार 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या 2 लाख 44 हजार 344 इतकी झाली आहे. तर मुंबईत 1 हजार 160 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments