
Maharashtra School Reopen : महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आला होता. मात्र आता या संपूर्ण शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळून शाळा सुरु केल्या जातील, अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
शाळा सुरु करण्याबाबतीत नेमके महत्त्वाचे मुद्दे काय, यावर आपण नजर टाकू.
- 24 जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
- शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील
- शाळा सोमवारी, 24 जानेवारीपासून सुरु करण्याची शिक्षण विभागाने केली होती मुख्यमंत्र्यांकडे विनंती
- शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमोर मांडला असता, त्यांची या प्रस्तावाला संमती
- ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या कमी आहे, त्याठिकाणी नियमांचे पालन करून शाळा सुरू होतील, वर्षा गायकवाड यांची माहिती
- शालेय शिक्षण विभागाकडून स्थानिक प्रशासनाला शाळा सुरु करण्याबाबतचे अधिकार दिले आहेत.
- कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शाळा सुरु करण्याचा निर्णय
- शाळा सुरु असताना शाळेतील 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यावर भर
- शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाला विनंती केली जाणार
- शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण असले पाहिजे
हे हि वाचा: