नॅशनल

Maharashtra Tableau : दिल्लीच्या राजपथावर गाजला ‘महाराष्ट्र माझा’

सर्वांचे लक्ष लागलेले दिल्लीच्या राजपथावर मोठ्या थाटात प्रजासत्ताक दिन साजरा झाला.

देशात आज 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा आनंद सर्वत्र दिसत असून राज्यसरकार कडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडला. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील महानगरपालिकेच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले. परंतु सर्वांचे लक्ष लागलेले दिल्लीच्या राजपथावर मोठ्या थाटात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. यावेळी उपस्थितांचे लक्ष होतं ते म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाकडे. याआधी 2015 साली चित्ररथाद्वारे ‘पंढरीची वारी’ आणि 2018 साली ‘शिवराज्याभिषेक’ दाखविण्यात आला होता या दोन्ही वेळी चित्र रथाला प्रथम क्रमांक मिळाला होता.

यावर्षी महाराष्ट्रातील चित्ररथाचे वैशिट्ये म्हणजे युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील कास पठारचा समावेश होता. तसेच राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती, प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘ब्लू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आली.

दुर्मीळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती होत्या. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments