खूप काहीराजकारण

Malik Vs Wankhede : बदली झाल्यानंतरही समीर वानखेडेंवर मलिकांचा जोरदार हल्लाबोल…

वानखेडे यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांच्या पत्नींच्या संपत्तीत झपाट्याने वाढ कशी ?

आर्यन खान प्रकरणावरून चालू झालेला या वादाला काही अंत दिसत नाही आहे. आर्यन खान प्रकरणाचा `दि एंड’ होऊन कित्येक महिने पालटले तरीही मुंबई एन. सी. बी. झोनल डायरेक्टर समीर वानखेडे अजूनही तितकेच चर्चेत आहेत.राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक रोज वानखेडेंचे नवनवीन फर्जीवाडे घेऊन मीडिया समोर येत आहेत. (Malik Vs Wankhede: After the transfer, Malik’s strong attack on Sameer Wankhede…)

जरी वानखेडेंची बदली झाली म्हणजे विषय संपला असे होत नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. सध्याच मालिकांनी वानखेडे अल्पवयीन असताना सद्गुरू नावाच्या बारचा परवाना घेतल्याचा फर्जीवाडा समोर आणला होता, जरी ही गोष्ट अजून सिद्ध नसली तरी त्यावर तपास सुरू आहे.

मालिकांनी वानखेडेंवर सरकारी नोकरीत मनमानी कारभार करत असल्याचे आरोप केले आहेत. वानखेडे यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांच्या पत्नींचा संपत्तीत झपाट्याने वाढ कशी ? हा प्रश्न उपस्थित करून त्यावर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

“जर कोणी मालिकांच्या या कामाला विरोध करून तक्रार करत असेल” तर तक्रार करणाऱ्याची सुध्दा तपासणी व्हावी, असे मलिकांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments