राजकारण

Maratha Morcha:मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन थेट अशोक चव्हाणांच्या बंगल्यावर

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी अशोक चव्हाण यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केले आहे. मराठा आरक्षणाच्या संबंधित काही मागण्यांना घेऊन हे आंदोलन होतं.

Maratha Morcha : ‘अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण झाले आहेत, तेव्हापासून मराठा समाजाचे कोणतेही काम मार्गी लागले नाही, त्यामुळे त्यांना पदावरून हटविल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही’ अशी टीका करत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी अशोक चव्हाण यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केले आहे. ‘मराठा तरुण आत्महत्या करत आहेत, मात्र निष्क्रिय मंत्री झोपा काढत आहेत’ अशी टीकादेखील आंदोलना दरम्यान अशोक चव्हाण यांच्यावर करण्यात आली.

आंदोलनांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्यावरही एकदा नजर टाकुयात…

3 ऑगस्ट 2021 रोजी अशोक चव्हाण यांनी मराठा समाजासाठी 36 पैकी 14 वस्तीगृहांची पूर्णता झाली असून 15 ऑगस्टला त्यांचे उदघाटन करणार असल्याची माहिती ट्विट मधून दिली होती. मात्र एकही वसतिगृह अजून सुरू झाले नाही.

सारथीची आठ कार्यालये उभारण्याचा निर्णय आधीच झाला होता, त्यामध्ये काही अडचणी असल्यास महसूल मंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेऊन तो विषय सोडवला जाईल, असे आश्वसन ही अशोक चव्हाण यांनी केले होते. मात्र ते ही अपूर्णच राहिले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही सुप्रिम कोर्टामध्ये दाखल केला गेला नाही.

भोसले समितीच्या शिफारसी अजूनही मागासवर्गीय आयोगाकडे पाठविल्या गेल्या नाहीत.

कोपर्डीची घटना अजूनही हाय कोर्टात नमूद झाली नाही, तर या घटनेतील आरोपीची सुटका करण्यात आली.

अशाप्रकारचे अनेक विषय समोर आणत अशोक चव्हाणांनी त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये कसे कमी पडले, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याा गोष्टींचा निषेध करण्यासाठी अशोक चव्हाणांच्या बंगल्याबाहेर मराठा क्रांची मोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलन केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments