क्राईम

बुल्ली बाय ॲप प्रकरणी मास्टर माईंड महिलेला अटक !

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विशाल कुमार झा हा तरुण ही सहभाग

मुस्लिम महिलांची बदनामी आणि कट रचणे असे संदेश सोशल मीडियावर काही दिवस वायरल होत होते. या घटनेची दखल घेत शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी याविरोधात तक्रार नोंद केली.

(Mastermind woman arrested in Bully Bai app case!)

सबंधित तक्रार दाखल झाल्यानंतर या मुंबई पोलीस यांनी तातडीने कारवाही करण्यास सुरूवात केली. त्यांनतर सोमवारी बंगळूर येथुन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विशाल कुमार झा या तरुणाला अटक करण्यात आली. त्याची सखोल चौकशी केल्या नंतर त्याची सोशल मीडिया वरील मैत्रीण ही यात सहभागी असल्याची माहिती त्याने दिली.

(Mastermind woman arrested in Bully Bai app case!)

या मास्टर माईंड महिलेला (सोशल मीडियावरील मैत्रीण) उत्तराखंड येथून मुंबई पोलीसांनी अटक केली असून या प्रकरणाचा आणखी सखोल तपास सुरू आहे. 31 डिसेंबर रोजी हे ॲप्लिकेशन अपलोड करण्यात आले आणि यातून काही विशिष्ट महिलांचे फोटो प्रसारित करण्यात आली होती. तसेच या ॲप संदर्भात काही अधिक महिती द्यायची असल्यास नागरिकांनी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments