आपलं शहरलोकल

Mega Block : रविवारी असणार मेगा ब्लॉक, पहा कुठल्या स्थानकावर असेल ब्लॉक

22 जानेवारीच्या रात्री 11:40 पासून ते मध्यरात्री 2:00 वाजेपर्यंत दादर येथून जलद आणि लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंगा ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गाने धावतील .

ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गाचे काम चालू आहे. यामुळे येत्या रविवारी या कामांचे परिणाम मध्य लाईनीच्या जलद अप आणि जलद डाऊन मार्गांवर होताना दिसतील. डाऊन जलद मार्गावर रविवारी मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 20 मिनिटांपर्यंत 14 तासांचा मेगा ब्लॉक असेल. तर रविवारी दुपारी 12:30 पासून ते 2:30 वाजे पर्यंत अप जलद मार्गावर दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mega Block: Mega block will be on Sunday, see which station will have the block…)

22 जानेवारीच्या रात्री 11:40 पासून ते मध्यरात्री 2:00 वाजेपर्यंत दादर येथून जलद आणि लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंगा ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गाने धावतील . या गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. ठाणे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्या थांबणार नसल्याने प्रवाशांना दादर, पनवेल किंवा कल्याण स्थानकावरून संबंधित गाडीत चढण्याची मुभा दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस वरून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या 23 जानेवारीच्या मध्यरात्री 2:00 वाजल्यापासून ते ब्लॉक संपेपर्यंत मुलुंड आणि कल्याण दरम्यान धीम्या डाऊन मार्गावर वळवण्यात येतील . या गाड्या देखील ठाण्याला थांबणार नाहीत. प्रवशांना संबंधित गाडी साठी कल्याण , दादर किंवा पनवेल स्थानकांवर जाऊन गाडी गाठावी लागेल .

पनवेलहून सुटणाऱ्या एक्स्प्रेस :-

लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस

मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस

मुंबई – मडगाव मांडवी एक्स्प्रेस

 

पनवेल येथे थांबणाऱ्या गाड्या :

तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस

मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस

मडगाव – मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस

 

रद्द केलेल्या एक्स्प्रेस गाड्या :

नांदेड- मुंबई तपोवन एक्स्प्रेस

कोल्हापूर- मुंबई कोयना एक्स्प्रेस

नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

 

रविवारी रद्द असणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या :-

मुंबई- पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस

मुंबई- करमाळी – मुंबई तेजस एक्स्प्रेस

मुंबई- पुणे- मुंबई डेक्कन एक्स्प्रेस

मुंबई- नांदेड तपोवन एक्स्प्रेस

जालना- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस

मुंबई- कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस

मुंबई- नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

(Mega Block: Mega block will be on Sunday, see which station will have the block…)

हे हि वाचा :

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments