राजकारण

मनसेचा एकमेव नगरसेवकही शिवसेनेच्या वाटेवर? नेमकं राजकारण काय? 

यंदा मुंबईत 227 ऐवजी 236 नगरसेवकांसाठी निवडणूक आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे.

2017 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 7 जागांमध्ये आनंद मानून घ्यावा लागला होता; पण त्यातील 6 नगरसेवकांनी मनसेचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. ( MNS’s only corporator on Shiv Sena’s path? What exactly is politics?)

मनसेचे फक्त एकच नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहेत, पण आता स्थिती अशी आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई हद्दीतील प्रभाग क्रमांक 166 चे एकुलते एक नगरसेवक संजय तूर्डेसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार, अशी बातमी सर्वत्र पसरत आहे. त्यामूळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

यावर संजय तूर्डेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी मुंबईतील प्रभाग क्रमांक 166 चा नगरसेवक आहे आणि वायरल होणारी बातमी केवळ विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे. माझ्या प्रभागात कलिना आणि चांदिवली मतदार संघ येतात आणि दोन्हीही मतदार संघातील आमदार माझे विरोधक आहेत.”

तूर्डेंनी आपल्या बोलण्यात महापौरांचादेखील उल्लेख केला. ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी मी मुंबई महापौरांना काही समस्यांमुळे प्रभागात बोलावले होते. तेव्हापासून विरोधकांनी माझ्याबद्दल असे चित्र-विचित्र मनघडाऊ गोष्टी व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. “राज ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा माझ्यावर ठाम विश्वास आहे आणि ते या गोष्टीला वावदेखील देणार नाहीत. “ते कधीही मनसे सोडणार नाहीत, असेही ते म्हणाले.

त्यांनी कलिना विधानसभेत किमान 3 मनसेचे नगरसेवक निवडून आणण्याचा शब्द दिला आहे.

मुंबई महानगर पालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारीपर्यंत संपणार आहे. त्यानंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्याने यंदा मुंबईत 227 ऐवजी 236 नगरसेवकांसाठी निवडणूक आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments