आपलं शहरखूप काहीनॅशनलनॉलेजफेमसविद्यापीठ

MPSC : एम.पी.एस.सीची पूर्वपरीक्षा आता 23 जानेवारीला…

परीक्षांचे सुधारित वेळापत्रक एम.पी.एस.सीच्या अधिकृत संकेस्थळ mpsc.gov.inवर जारी करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांच्या वेळापत्रकात फेरबदल करून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्या वेळापत्रकानुसार 2 जानेवारी रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2021 आता 23 जानेवारीला होणार आहे. 22 जानेवारी रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा – 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 आता 29 जानेवारीला होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा 2020, पेपर क्रमांक 2, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार होती पण त्याची दिनांक बदलून आता 30 जानेवारी करण्यात आली आहे. (MPSC: MPSC pre-exam now on 23rd January…)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्याने उमेदवारांची कमाल वयोमर्यादा उलटत होती. त्यामुळे या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे जेणेकरून या उमेदवारांना परीक्षेची संधी मिळो. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम.पी.एस.सीच्या अधिकृत संकेस्थळ mpsc.gov.inवर जारी करण्यात आले आहे.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments