आपलं शहरक्राईमघटनानॅशनल

Mumbai 1993 Bomb Blast : 93 च्या स्फोटातील दहशतवादी सलीम गाझी ठार

शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.

1993 ते चित्तथरारक दृश्य मुंबईकर कधीच विसरू शकत नाही.दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांनी घडवून आणलेल्या या कट कारस्थानात 250 हून अधिक जन मरण पावले होते. तर 700 हून अधिक लोक बेघर झाली होती. या स्फोटात सहभागी असणारे अबू सालेम , फारुख टकला मुंबई पोलिसांच्या हाती तर लागले आहेत पण हे कट कारस्थान रचणारे कित्येक आरोपी अजून अटक झाले नाही आहेत. त्यातीलच एक होता सलीम गाझी जो पाकिस्तानात फरार होता. (Mumbai 1993 Bomb Blast: 93 blast kills terrorist Salim Ghazi)

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा शनिवारी पाकिस्तानमधील कराची येथे मृत्यू झाला . मीडिया रिपोर्ट्स नुसार , तो गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याला रक्तदाबाच्या विविध आजारांनी ग्रासले होते. मात्र शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. दाऊद इब्राहिमसोबत 1993 च्या मुंबई सीरियल ब्लास्टमध्ये सलीम गाझी देखील आरोपी होता.

सलीम गाझी पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी सतत ठावठिकाणा बदलत होता. तो अनेक वर्षे दुबईत हि राहिला , त्यानंतर तो पाकिस्तानमध्ये छोटा शकीलच्या अवैध धंद्यातही सक्रिय होता. पण अखेर या आरोपीचा पाकिस्तानच्या कराची येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments