Mumbai Central Railway Mumbra : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील घरांना धोका, “जीव देऊ पण वाचवू” जितेंद्र आव्हाडांचा इशारा…
‘येथे कुणीच घाबरणारं नाही, लागल्यास जीव देऊ पण नक्कीच वाचवू," असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेला दिला आहे.

सरकारी जमिनींवर होणारे अतिक्रमण लवकरात लवकर थांबवावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सात दिवसांच्या आत, रेल्वे ट्रॅकच्या जवळ राहणाऱ्यांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. यावर महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, हे सर्व धमकावण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी केले जात आहे. ‘येथे कुणीच घाबरणारं नाही, लागल्यास जीव देऊ पण नक्कीच वाचवू,” असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेला दिला आहे. (Mumbai Central Railway Mumbra: Danger to houses near Mumbra railway station, “Give life but save” Jitendra Awhad’s warning … )
मध्य रेल्वेने मुंब्रा स्थानकाच्या रेल्वे रुळांजवळ राहणाऱ्या लोकांना नोटीस पाठवून 7 दिवसांच्या आत घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट केले आहे की ,” येथे कुणीच घाबरणार नाही, आम्ही जीव देऊ पण नक्कीच वाचवू’.
जितेंद्र आव्हाड यांनी आज मिठागरांच्यासंदर्भात देखील ट्विट केले आहे. “मिठागरे आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगपासून वाचवतात . मुंबई परिसरातील मीठागरांवर घरे बांधण्याचा प्रस्ताव आला होता. पण, या ठिकाणी घरे बांधण्यासाठी आम्ही म्हाडाकडून कोणतीही परवानगी देणार नाही. या प्रकरणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुद्धा केली आहे. आम्ही मिठागरांवर घर बांधू देणार नाही कारण मिठागरांवर घरे मुंबई आणि मुंबईकरांसाठी घातक ठरू शकते, असे ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
हे हि वाचा: