Uncategorizedआपलं शहरहेल्थ

Mumbai Cordelia Cruise : मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रुझ वर अडकले 2000 प्रवासी ….

सर्व प्रवाशांची चाचणी घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच त्यांना उतरण्यास परवानगी दिली जाईल.

पणजी: कोविड-19 च्या वाढत्या उद्रेकादरम्यान, मुंबई-गोवा लक्झरी क्रूझ जहाज ‘कार्डेलिया’ या जहाजावरील सुमारे 2,000 लोक संकटात सापडले, जेव्हा जहाजातील चालक दलातील एक सदस्य कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.’कार्डेलिया’ या लक्झरी क्रूझ जहाजावरील सुमारे 2,000 प्रवाशांना खबरदारी म्हणून गोव्यातील मोरमुगाओ बंदरापासून दूर जहाजावर ठेवण्यात आले आहे.(Mumbai Cordelia Cruise: 2000 passengers stranded on Mumbai-Goa Cordelia Cruise ….)

मुंबई-गोवा लक्झरी क्रूझ जहाज ‘कार्डेलिया’ मधील सुमारे 2,000 प्रवाशांना गोव्याच्या मोरमुगाओ बंदरात ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी दिली.ते म्हणाले की, “सर्व प्रवाशांची चाचणी घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच त्यांना उतरण्यास परवानगी दिली जाईल,”

आता गोव्याहून परत मुंबईकडे रवाना झालेल्या प्रवाशांबद्दल बीएमसीने काय निर्णय घेतलाय, तेही आपण समजून घेऊ. क्रुझमधील प्रवाशांच्या तपासणीसाठी स्थानिक सहाय्यक पालिका आयुक्त आणि डॉक्टरांची टीम तैनात करणार आहे. जे आधीच पॉझिटिव्ह आहेत, त्यांना भायखळामधील बीएमसीच्या कोविड सेंटर क्वारंटाईनमध्ये केलं जाईल आणि उपचार केले जातील. सोबतच इतर सर्व प्रवाशांची आणि क्रूझ मेंबरचीही कोरोना चाचणी केली जाईल. या सगळ्यांचे रिपोर्ट येईपर्यंत सर्व प्रवाशी आणि क्रुझ मेंबर क्रूझवरच राहतील. ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील, त्यांना घरी होम क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले जातील बाकी पॉझिटीव्ह आलेल्या नागरिकांना क्रूझवर, हॉटेलमध्ये किंवा भायखळ्यातील बीएमसीच्या कोविड सेंटरमध्ये शिफ्ट केले जाईल.

हे हि वाचा:

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments