
1 जानेवरी 2022च्या दिवशी कॉर्डेलिया क्रूझ मुंबईकडून गोव्याच्या दिशेने रवाना झाली होती. एकूण 2000 प्रवासी या क्रूझमध्ये प्रवास करत होते. 2 जानेवारीला झालेल्या रॅपिड चाचणीमध्ये प्रवाश्यांतील एका ग्रुपचा अवहाल पोझिटीव आला.त्यामुळे क्रूझवरील सर्वांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत 2000 प्रवाशांपैकी 66 जण कोरोनाबधित सापडले.त्यातील 6 जण उपचारार्थ गोव्यात उतरले, तर अन्य प्रवाशांनी तेथील विलगीकरण कक्षात दाखल होण्यास नकार दिले. त्यामुळे क्रूझ पुन्हा मुंबईकडे वळवण्यात आली होती.
(Mumbai Corona News: 60 patients admitted to Mumbai with Cordelia Cruise ….)
जहाज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता मुंबईत दाखल झाली. कोरोनाबाधित असलेल्या 66 जणांमधील 6 जणे गोव्यात उतरले तर उर्वरित बाधितांना रिचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्रात दाखल केले. काही बाधितांना त्यांच्या इच्छेनुसार सुशल्क हॉटेल कोविड केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्या वाहतुकीसाठी 17 आसनी 5 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. दोन प्रयोगशाळांमार्फत क्रूझवरील इतर प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
जहाजावरील प्रवाशांचा अहवाल येईपर्यंत एकाची सुटका होणार नाही. पोझिटीव प्रवाशांना विलगिकरण कक्षात ठेवले जाईल तर ज्यांची चाचणी निगेटिव्ह येईल त्यांना 7 दिवसांकरिता गृहअलगीकरणात ठेवले जाईल.त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारला जाईल.
हे हि वाचा: