आपलं शहरघटनाबीएमसी

Mumbai Corona News : मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन सुसज्ज जंबो कोविड सेंटर लवकरच कार्यान्वित…

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई प्रशासन हवे ते प्रयत्न करत आहे.

ओमायक्रोम विषाणूचा संसर्ग देशभर हाहाकार माजवत आहे. याला आळा घालण्यासाठी मुंबई प्रशासन हवे ते प्रयत्न करत आहे. मुंबईतील चुनाभट्टी परीसरात स्थित असलेले सोमय्या ट्रस्टच्या जागी म्हाडाच्या वतीने बांधले जाणारे ऑक्सीजन खाटांनी सुसज्ज असणारे जंबो कोविड सेंटर येत्या 15 दिवसात सुरू होणार आहे. या सेंटरच्या कामाचा आढावा खासदार राहुल शेवाळे यांनी घेतले आहे . या पाहणी दौऱ्यात खासदार शेवाळे यांच्यासह नगरसेवक रामदास कांबळे, डीन डॉ. सुजाता पोळ, अतिरिक्त डीन डॉ. रविकिरण गोळे, कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत धात्रक, पालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. नामदेव तळपे, सोमय्या ट्रस्ट चे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. (Mumbai Corona News: The first fully equipped Jumbo Covid Center in Mumbai will be operational soon …)

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन येतील प्रत्येक खाटांन ऑक्सीजन पुरवठ्याची सुविधा असून याठिकाणी अतिदक्षता विभाग आणि लहान मुलांसाठीही विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे. 1200 खाटा असलेले हे सेंटर 18 हजार स्क्वेअर मीटर जागेत उभारण्यात आले आहे.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, “कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सायन – चुनाभटटी जंबो कोविड सेंटरची भूमिका फार महत्त्वाची ठरू शकेल. पूर्णपणे ऑक्सिजन युक्त खाटा उपलब्ध असलेला आणि ऑक्सिजनचा अखंड पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था असलेल्या या सेंटरमुळे पूर्व उपनगरातील नागरिकांना कोरोना संकटात मोठा दिलासा मिळू शकेल, याची मला खात्री आहे.”

हे हि वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments