आपलं शहरघटनाबीएमसी

Mumbai Corona News: मुंबईतील शाळांवर पुन्हा बंद राहण्याची वेळ, राज्यात 15 ते 18 वयोगटांच्या लसीकरणाला सुरुवात …

4 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

राज्यात ओमिक्रोनचा प्रसार दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चाललेला आहे. यासाठी राज्य सरकार रोज नवनवीन प्रतिबंध घालत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून लोकांचे लक्ष हे मुंबईतील शाळा आणि कॉलेजांकडे होते. आणि मुंबईतील वाढत्या संक्रमणाच्या पार्श्भूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबतचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Corona News: Time to re-close schools in Mumbai, start vaccination for 15 to 18 year olds in the state …)

4 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले आहेत. फक्त 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी मुंबई हद्दीतील शाळांना मिळाली आहे.

3 जानेवारी पासून राज्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिकेने शाळांना शालेय आवारात लसीकरण कार्यक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. शाळेने आणि महाविद्यालयाने आपल्या 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे लसीकरण करून घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेने दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालिकेने जनतेला केले आहे.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments