आपलं शहरबीएमसीहेल्थ

Mumbai Corona Update : ओमीक्रोन हा तर साधा आजार , आरोग्य अधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय?

मुंबईत दिस्चार्ज रेट देखील 90% वर पोहचला आहे.

मुंबई टास्क फोर्सच्या अनुमानाने, कोरोनाचा वेग नववर्षाच्या तिसऱ्या आठवडयात मंदावणार होता, पण ही रुग्णसंख्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंदावण्यास सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत दररोज दिवसाला 20,000 पेक्षा जास्त रुग्ण मिळत होते पण आता हा आकडा थोड्या प्रमाणात मंदावला आहे. मुंबईत रोज कमीत कमी 11,000 रूग्ण मिळत आहेत. चांगली बाब म्हणजे यातील साधारणतः साडे 9 हजार रूग्ण हे गंभीर परिस्थितीच्या बाहेर असतात. (Mumbai Corona Update : Micro is a simple disease, what exactly do health officials say?)

मुंबईत 39,000 बेड्सपैकी केवळ 3 ते 4000 बेड्सवर रूग्ण आहेत. मुंबईत दिस्चार्ज रेट देखील 90% वर पोहचला आहे. मुंबईत ओमायक्रोनचा वेग मंदावण्यास सुरुवात झाली आहे. ओमायक्रोनचे रूग्ण घरात उपचार घेऊनच बरे होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही आहे.

तज्ञांच्या मते ,” जरी मुंबईत कोरोनचा वेग मंदावत असला तरी कोरोना पूर्णपणे गायब होणे अशक्य आहे. जर कोरोनाचा वेग अशाच मंदावत राहिला तर शक्यता आहे की कोरोना इतर सर्वसामान्य आजारांसारखाच आपल्यासोबत राहील. इतर सर्वसामान्य आजारांसरखाच म्हणजेच पावसाळ्यात येणाऱ्या सर्दी खोकल्याच्या साथीप्रमाने.”

ओमायक्रोन डेल्टाच्या तुलनेत खूप शांत आहे. ओमायक्रोनची फुप्फुस्यांवर आक्रमण करण्याची गती खूप मंद आहे. त्यामुळे ओमायक्रोन हा डेल्टा वरियंट पेक्षा कमी प्रभावशाली आहे.

हे हि वाचा :

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments