बीएमसीहेल्थ

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा ‘ The End ‘ लवकरच…

मुंबईतील पँडेमिक परिस्थिती एन्डेमिककडे वळत आहे.

कोरोनाच्या सलग 2 लाटांनंतर मुंबईत तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली होती. या लाटेचा वेग पहिल्या 2 लाटांपेक्षा अधिक दिसत होता. पण आता मुंबई प्रशासनाने मुंबईकरांना एक दिलासा देणारे वक्तव्य केले आहे. रुग्नसंख्या वाढत असल्याने लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होऊन हार्ड इम्युनिटी तयार होत आहे. त्यामुळे मुंबईतील पँडेमिक परिस्थिती एन्डेमिककडे वळणार आहे. हा आजार इतर सामान्य आजारासारखा होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. असा विश्वास पालिकेने दाखवला आहे. जर होम क्वारंटाईन असणाऱ्या रुग्णाबाबतीत नियम मोडल्याची तक्रार आली तर त्याला सरळ क्वारंटाईन सेंटर मध्ये भरती करण्यात येणार आहे. (Mumbai Corona Update: Mumbai Corona’s ‘The End’ Coming Soon …)

तिसऱ्या लाटेत गेले तीन दिवस 20 हजाराहून रूग्ण आढळून येत आहेत. टास्क फोर्सच्या अनुमानाने हि रूग्णसंख्या जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कमी होणार होते पण चांगली गोष्ट म्हणजे रूग्णसंख्या दुसऱ्या आठवड्यातच कमी होत आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे लोकांमध्ये अँटी बॉडी तयार होत आहे त्यामुळे हार्ड इम्यूनिटी तयार होत आहे. मुंबईकर सध्या पँडेमिककडून एन्डेमिककडे जात आहेत. यामुळे येत्या काळात कोरोनाचा आजार सर्वसामान्य आजारांप्रमाणे होईल, असा विश्वास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या करण्याची गरज नसल्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.मुंबईत लोकांची दाटीवाटीची वस्ती आहे त्यात रोज हजारो- लाखो लोकं लोकल मध्ये प्रवास करतात त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या कमी केली जाणार नसल्याचे निर्देश सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

जरी रूग्ण घरी राहून म्हणजेच होम क्वारंटाईन राहून बरे होत असेल तरी त्यांच्यावर तेथील आरोग्य विभागाचे आणि वॉर्ड कार्यालयाचे पूर्णपणे लक्ष असणार आहे. जर यातील कोणत्या रुग्णाने होम क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केले तर त्याला सरळ क्वारंटाईन सेंटर मध्ये भरती करण्यात येणार आहे , असे निर्देश काकाणी यांनी दिले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments