क्राईम

Mumbai Crime : मुंबईत 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त; पोलिसांच्या कारवाईत 7 आरोपींना अटक

चार व्यक्ती 2000 रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याचं पोलिसांना कळलं होतं

Mumbai Crime : मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून त्या दैनंदिन व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, त्यानुसार पोलिसांनी आपल्या गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकाराची संपूर्ण माहिती काढली. चार व्यक्ती 2000 रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याचं पोलिसांना कळलं होतं, त्याप्रमाणे माहिती मिळालेल्या गाडीची झडती घेतली असता या गाडीमध्ये 2000 रुपयांच्या नोटांचे 250 बंडल आढळून आले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे आरोपी बनावट नोटा छापून त्यांचे वितरण करत होते अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका आंतरराज्यीय टोळीला आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडून सात कोटी रुपये, 7 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. दहिसर परिसरात या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

यामध्ये 2000 रुपयांच्या एकूण 25 हजार नोटा असे एकूण पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यानंतर सविस्तर कारवाई करून, आरोपींची झडती घेतल्यानंतर पोलिसांना 7 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, एक लॅपटॉप, आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र आणि 28,170 रोख रक्कम सापडली आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments