घटना

200 डॉक्टरांना कोरोना होण्याचं मुख्य कारण आलं समोर

पूर्णपणे लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संसर्ग पसरल्यामुळे अनेक खाजगी रुग्णालयांनी तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर आणि परिचारिकांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. इतकच नाहीतर निवासी डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होतेय. मुंबईतही गेल्या 72 तासांत 200 हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झालेय. सोबत सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयातील अनेक डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारीही कोरोना पॉझिटीव्ह झालेत. त्यामुळे मुंबईत कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे.

शहरात निवासी डॉक्टरांची कमतरता भासल्याने रुग्णांची काळजी कोण घेणार, हा प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी या बातमीला दुजोरा दिलाय. त्यातच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत 200 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागात भिती पसरलीये. राज्यभरातील कोरोना पॉझिटीव्ह डॉक्टरांची संख्या 291 च्या पुढे गेली आहे.

पूर्णपणे लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संसर्ग पसरल्यामुळे अनेक खाजगी रुग्णालयांनी तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर आणि परिचारिकांची नियुक्ती केली आहे. बुधवारी, वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे 30 % आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही रविशंकर यांनीदेखील याबद्दल खंत व्यक्त केली.

कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या काहींमध्ये मध्यम स्वरुपाची लक्षणे आढळत आहेत. तर काहींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रुग्णालय सुरळीत चालावं, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात काही डॉक्टर आणि परिचारिकांची नियुक्ती केली आहे. मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील किमान 30 कर्मचारी सध्या कोविड पॉझिटिव्ह माहितीही समोर येत आहे.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने, आणि रुग्णालयांवरील ताण अचानक वाढल्याने अनेक डॉक्टर ओमिक्रॉनसह कोरोनाची शिकार झाल्याची माहिती आता समोर येऊ लागली  आहे. (why should doctor has been corona positive)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments