
Mumbai Local : ट्रेनमध्ये प्रवास करताना गाणी ऐकणं, फोनवर बोलणं सर्वांनाच खूप आवडतं, मात्र आपल्या या आवडीचा प्रवाशांना त्रास होऊ नये, हे पाहण्याची जबाबदारी ही आपलीच असते. गाणी मोठ्या आवाजात ऐकणाऱ्या किंवा मोठमोठ्याने फोनवर बोलणाऱ्या प्रवाशांवर आता निर्बंध लावले आहेत. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी आल्यास त्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. असे नवीन नियम रेल्वे प्रशासनाने लावले आहेत. ( Mumbai Local : It will be expensive to talk loudly in the local )
आपले शौक पूर्ण करण्याची आवड सगळ्यांनाच असते. पण याचा त्रास बाकी प्रवाशांना होत असेल याचे भान काही प्रवाशांना नसते. अशा प्रवाशांची तक्रार रेल्वेकडे करण्यात आली आहे. याच प्रवाशांवर आता निर्बंध लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारच्या तक्रारी परत येऊ नयेत, म्हणून काही नवीन नियम लागू केले आहेत. ती नियमावली पुढीलप्रमाणे आहे…
प्रवासी मोठ्या आवाजात फोनवर बोलणार नाही, तसेच हेडफोनशिवाय गाणीही ऐकणार नाही.
या निर्बंधाचे पालन होत आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी तिकीट तपासनीस व रेल्वे कर्मचाऱ्यांची असेल. अशा प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून निर्बंधाबाबतचा सल्ला दिला जाईल.
रात्रीस ग्रुपने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गप्पा मारण्याची परवानगी नसेल.
अशा प्रवाशांबद्द्ल दुसऱ्या प्रवाशांनी तक्रार केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
60 वर्षांवरील वृद्ध, एकट्या महिला तसेच दिव्यांग यांना रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मदत केली जाईल.
अशाप्रकारे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देण्याची तसेच गरजू प्रवाशांची पूर्णपणे काळजी घेण्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली आहे. या कर्मचाऱ्यांनी ट्रेनमधील प्रवाशांना याबद्दलची माहिती देऊन सरळ वर्तन करण्याचे सल्ले दिले जातील. तसेच ‘या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांबरोबर शिस्तीने, शांतपणे व नम्रपणे वागावे व प्रवाशांना तक्रारीची संधी देऊ नये’ असे नियम कर्मचाऱ्यांसाठी लावले गेले आहेत. सतत नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर सक्त कारवाई केली जाणार आहे.
हे हि वाचा: