लोकल

लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेत वाढ, टवाळखोरांना मिळणार सजा

मध्य रेल्वेने मार्च 2023 पर्यंत आपल्या लोकल ट्रेनच्या सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेत वाड करण्यात आली आहे. यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने मार्च 2023 पर्यंत आपल्या लोकल ट्रेनच्या सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत दररोज हजारो महिला लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. मात्र काहीदा रात्रीच्यावेळी अनेक टवाळखोर महिलांच्या डब्ब्यांमध्ये चढतात, किंवा महिलांसोबत छेडछाडीचे प्रकार घडतात, याला आळा बसावा म्हणून 2021 मध्ये मुंबईतील मध्य रेल्वेने महिला प्रवाशांच्या डब्यांमध्ये 605 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. आतापर्यंत मध्य रेल्वेने महिला डब्यांवर आणि वेगवेगळ्या स्थानकांवर एकूण 3122 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

महिला डब्यातून प्रवास करताना कोणत्याही महिला प्रवाशासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, हे लक्षात घेऊन येत्या एक वर्षात मुंबई मध्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व लोकल ट्रेनच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कंट्रोल रूम असणार आहे. यामध्ये, RPF कर्मचाऱ्यांच्या मार्फत महिला डब्ब्यांसह स्टेशन परिसरावर 24 तास नजर ठेवली जाणार आहे.

‘मेरी सहेली’ मोहीम

मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार (PRO Shivaji Sutar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबई विभागाची मध्य रेल्वे नेहमीच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील असते. महिलांच्या सुरक्षेबाबत मध्य रेल्वेकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ‘मेरी सहेली’ मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. RPF आणि GRP च्या महिला पोलिसांमुळे लांबचा प्रवास करणाऱ्या महिलांनादेखील दिलासा मिळाला आहे.

3,000 हून अधिक सीसीटीव्ही

प्रवासात महिला प्रवाशांना काही अडचण आल्यास त्या महिला प्रवाशांची समस्या सोडवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफच्या महिला पोलिस मदत करतात. सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या महिला डब्ब्यांसह स्थानक परिसरात आतापर्यंत एकूण 3,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments