लोकल

Mumbai Local Update : वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर होणार झगमगाट, प्रवाशांसाठी गूड न्यूज

या योजनेत प्रवेश प्रकल्पांमध्ये सुधारणा , सेवा इमारती , स्टॉल्स, किऑस्क इ. च्या स्थलांतरना सह परिभ्रमण आणि प्रवेशामध्ये तसेच विद्युत सेवांमध्ये सुधारणा केली जाणार आहे.

मुंबई रेल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनने (MRVC) मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना ‘ गुड न्युज’ दिली आहे. लवकरच मुंबई लोकलमधील 19 स्थानकांचे कायापालट करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 947 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या योजनेत मध्य मार्गावरील 11 स्थानके तर पश्चिम मार्गावरील 8 स्थानकांचा समावेश असणार आहे. ही कामे विविध 7 स्तरांमध्ये राबवण्यात येणार असून, MRVC ने यासाठी निविदाही मागवल्या आहेत. (Mumbai Local Update: Blaze on Western and Central Lines, Good News for Passengers)

MRVC च्या अधिकाऱ्याने सांगितले की,” गाड्यांची लांबी 12 ते 15 डब्ब्यांपर्यंत वाढवल्यामुळे जागेची कमतरता देखील भासणार आहे.” MRVCच्या वतीने स्थानकांचे कायापालट करण्याची योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत प्रवेश प्रकल्पांमध्ये सुधारणा , सेवा इमारती , स्टॉल्स, किऑस्क इ. च्या स्थलांतरना सह परिभ्रमण आणि प्रवेशामध्ये तसेच विद्युत सेवांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. तसेच, हिरवळ वाढवण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे.

या योजनेत मुख्यतः मध्य रेल्वेवरील भांडुप, मुलुंड, डोंबिवली, शहाड, नेरूळ, कसारा तसेच जीटीबी नगर , चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द स्थानकाचा समावेश आहे. त्यासह पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल, खार रोड, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई आणि नालासोपाराचा देखील समावेश आहे.

मुंबई शहर अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टचा ( MUTP- 3A) भाग आहे. या प्रकल्पाला एशियन इन्फ्रास्त्र्क्चर इनवेस्टमेंट बँक वित्तपुरवठा करत आहे. या प्रकल्पाच्या नेतृत्वाखाली, MRVC मुंबई लोकल स्थानकांच्या विकासाची कामे करत आहे. MRVC च्या नवीन योजनांमुळे मुंबई लोकल मधील अनेक स्थानकांचे चित्र पालटणार असून उपनगर रेल्वे सेवा अधिक मजबूत होणार आहे.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments